अंबरनाथ केमिकल कंपनीतून गॅसगळती, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

अंबरनाथ केमिकल कंपन्यांमध्येस शनिवारी रात्री विषारू वायू गॅसची गळती झाली. यामुळे कंपन्यांलगतच्या परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातारण पसरले होते. मोठ्या प्रमाणात वायू गळती झाल्याने लोकांना खोकल्याचा आणि श्वसनाचा प्रचंड त्रास होत होता.

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये शनिवारी रात्री वडवली केमिकल इंडस्ट्रीमधून गॅस गळती झाली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या लगत काही अंतरावर ही केमिकल इंडस्ट्री आहे. या केमिकल कंपनीमधून शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे नागरिकांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागला.

अंबरनाथ केमिकल कंपन्यांमध्येस शनिवारी रात्री विषारू वायू गॅसची गळती झाली. यामुळे कंपन्यांलगतच्या परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातारण पसरले होते. मोठ्या प्रमाणात वायू गळती झाल्याने लोकांना खोकल्याचा आणि श्वसनाचा प्रचंड त्रास होत होता. या गॅसला उग्र वास येत होता. या वायु गळतीचे प्रमाण एवढे होते की नागरिकांना समोर अंधुक अंधुक दिसत होते. धुक्यासारखे वातावरण निर्माण झाले होते.

वायु गळतीमुळे अंबरनाथमधील रस्त्यावर समोरचे काही दिसत नव्हते एवढा वायुचा थऱ तयार झाला होता. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागल्याने दारे खिडक्या बंद करुन घरात कोंडून बसले होते. हताश झाल्यावर नागरिकांनी मदतीसाठी प्रशासनाला बोलाविले. तसेच अग्निशमन दलही घटनास्थळी रावाना झाले. परिसरातील परिस्थितीचा आढावा घेऊन कंपन्यांना केमिकल प्रक्रिया बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अंबरनाथमध्ये गॅस सोडण्याचे प्रकार हे नियमित घडत असतात, मात्र शनिवारी हा प्रकार जास्त प्रमाणात घडल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.