भिवंडीत क्षत्रीय पाचकळशी कुटुंबीयांच्या गौरीस मांसाहारी नैवेद्य ! 

भिवंडी : गौरी – गणपतीचा सण म्हणजे तमाम अबाल वृद्धांचा उत्साह वाढवणारा सण.विशेषतः देवाला नैवेद्य म्हणून गोडधोड मिष्टान्न खाद्यपदार्थ बनविले जातात.मात्र काही ठिकाणी गौरींसमोर खास मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.ज्यामध्ये मटण ,मच्छी ,चिंबोरी,अंडे आदी मांसाहारी पदार्थांचे  ताट नैवेद्य म्हणून गौरी समोर ठेवले जाते.भिवंडी शहरातील पाचकळशी क्षत्रीय पाठारे समाजातील विशाल पाठारे यांच्या घरी तीन पिढीपासून ही परंपरा त्याांचे आजोबा,वडील यांच्याकडून मागील पन्नास वर्षांपासून सुरू आहे.गौरीला नैवैद्य म्हणून मांसाहार पदार्थांचे ताट नैव्यद्यासाठी मांडायचे असते म्हणून घरातील गणपती उत्सव दीड दिवसांचा साजरा केला जातो व त्यानंतर गौरी आगमन ,गौरी पूजन व विसर्जन केले जाते.वडिलोपार्जित सुरू असलेली हि परंपरा आज देखील कायम असल्याची महिती तिसऱ्या पिढीतील विशाल पाठारे यांनी दिली आहे.