ganesh naik

नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस मिळायला हवी, अशी भुमिका भाजपा नेते आमदार गणेश नाईक यांनी जाहीर केली आहे. तशी मागणी देखील त्यांनी नवी मुंबई महापालिकेकडे केली आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी ते बोलत होते. आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.

    नवी मुंबई :   नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस मिळायला हवी, अशी भुमिका भाजपा नेते आमदार गणेश नाईक यांनी जाहीर केली आहे. तशी मागणी देखील त्यांनी नवी मुंबई महापालिकेकडे केली आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी ते बोलत होते. आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.

    आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकुण आर्थिकदृष्ट्या विचार करुन सामान्य नागरिकांना कशी लस उपलब्ध करून देणार याबाबत निर्णय घेतीलच. पण, जर केंद्र सरकारने ही लस सर्वसामान्यांना मोफत उपलब्ध करुन दिली नाही तर नवी मुंबईतील सुमारे १५ लाख नागरिकांना महापालिकेने लस मोफत उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी बजेटमध्ये १५० कोटींची तरतुद करण्यात यावी अशी मागणी आपण नुकतीच पालिका आयुक्तांकडे केली आहे. नवी मुंबईतील नागरिकांना मोफत लस मिळावी हीच आमची भूमिका आहे असल्याचे गणेश नाईक म्हणाले.

    शिवसेना उप विभाग प्रमुख मनोज शिंदे, शाखा प्रमुख सागर शिंगाडे, माजी उपविभाग प्रमुख शंकर पाटील, आनंद पवार, उपविभाग संघटक मीनाताई पाटील, अखलाक शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे राहुल कश्यप या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आज नवी मुंबई भाजपा निवडणूक प्रभारी आमदार अँड आशिष शेलार आणि आ. गणेशजी नाईक यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

    क्रिस्टल हाऊस येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, सागर नाईक, संदीप नाईक यांच्यासह संजय उपाध्याय असे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील जनतेच्या सेवेसाठी आपण काम करीत आहोत. जनतेने आपल्याला प्रेम दिले असेही त्यांनी नमूद केले.