सलग २५ दिवस कोरोनाविषयक काम करणाऱ्या शिक्षकांना विश्रांतीसाठी कार्यमुक्त करा – अनिल बोरनारे

कल्याण : कोरोनाच्या कामासाठी नेमलेले शिक्षक सलग २५ दिवसांपासून काम करीत असून आता त्यांना विश्रांतीसाठी तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी भाजपा शिक्षक महासंघाचे कोकण विभागाचे अध्यक्ष

 कल्याण : कोरोनाच्या कामासाठी नेमलेले शिक्षक सलग २५ दिवसांपासून काम करीत असून आता त्यांना विश्रांतीसाठी तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी भाजपा शिक्षक महासंघाचे कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण डोंबिवलीमधील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या सेवा कोविड १९ च्या कामासाठी अधिग्रहित केल्या आहेत. शिक्षकांनीही संकटाच्या काळात हे कर्तव्य समजून कामे स्वीकारली.  ज्या विभागात कोविड रुग्ण सापडला त्या परिसरात घरोघरी जाऊन हे सर्व शिक्षक सर्वेक्षण करून कुणाला सर्दी, ताप, खोकला तसेच अन्य व्याधी आहेत का याबाबत दररोज लेखी अहवाल आरोग्य अधिकाऱ्यांना देत आहेत. या कामासाठी सलग २५ दिवस उलटून गेल्यानंतरही कार्यमुक्त केले नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. अन्य महानगरपालिका शिक्षकांना रोटेशन ने १५ दिवसासाठी काम देत आहे.  याच धर्तीवर अन्य कर्मचाऱ्यांना घेऊन अनेक दिवसांपासून काम करीत असलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे, सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षकांना ५० लाखाच्या विम्याचे संरक्षण देण्याची मागणीही अनिल बोरनारे यांनी पालिकेकडे केली आहे.