goats

काल रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे बकरे असलेल्या गोदामात अचानक पाणी शिरले आणि त्यातच एकूण १५ बकऱ्यांचा(15 Goats Dead) दुर्दैवी अंत झाला.

    ठाणे : गेले दोन दिवस सतत पडत असलेल्या पावसाने(Rain) सर्वत्र हाहाकार उडाला आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी भरत असून याचा फटका जनसामान्यांना बसत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. यातच मुंब्र्यातील(Goats Dead In Mumbra) एका दुर्दैवी घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

    एक दिवसावर आलेल्या ईदसाठी(Eid) मोहमद फहाद या व्यापाऱ्याने एकूण २९ बकरे(Goats For Eid) विक्रीसाठी आणले होते. एका गोदामात हे बकरे ठेवले होते व त्यांच्या घाऊक विक्रीचा सौदादेखील काल उशिरा ठरला होता. आज सकाळी ग्राहक येऊन ते बकरे न्यायचे ठरले होते परंतु पावसाने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. काल रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे बकरे असलेल्या गोदामात अचानक पाणी शिरले आणि त्यातच एकूण १५ बकऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. १४ बकऱ्यांना वाचविण्यात यश आले खरे परंतु मेलेल्या बकऱ्यांमुळे सदर व्यापाऱ्यांचे जवळपास तीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मोहम्मद फहाद या व्यापाऱ्याने दिली.