‘मुनमुन मिसळ’च्या आजींचे वृद्धापकाळाने निधन

डोंबिवली : डोबिंवली शहरात अनेक वर्षे मुनमुन मिसळ या नावाने परिचित असलेल्या आजींचे आज शुक्रवारी सकाळी ५.३० वा. वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मुनमुन मिसळ या नावाने गेली अनेक वर्षे

डोंबिवली : डोबिंवली शहरात अनेक वर्षे मुनमुन मिसळ या नावाने परिचित असलेल्या आजींचे आज शुक्रवारी सकाळी ५.३० वा. वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मुनमुन मिसळ या नावाने गेली अनेक वर्षे परिचित असणाऱ्या आजीचे नाव कमल मुरूडेश्वर आहे. तशीच त्या ९० वर्षांच्या होत्या. पश्चिमेकडील दीनदयाळ रोडवरील रत्नदीप सोसायटी येथे त्या वास्तव्यास होत्या. विशेष म्हणजे कमल मुरुडेश्वर या ठाण्याच्या मामलेदार मिसळवाल्यांची बहिण होती. पूवी त्या ठाण्यातून येऊन डोंबिवलीत संध्याकाळी मिसळ विकत असत. 

डोंबिवलीकरांना ती मिसळ तिखट वाटू नये म्हणून त्या थोड्या मिसळ माईल्ड करीत असत पण त्यावेळीही त्या पार्सल देत नसत. त्यानंतर त्यांनी एव्हरेस्ट बिल्डिंग येथे स्वतःचा मिसळ व्यवसाय सुरु केला. ठाणे महापालिका शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत असतांना त्यानंतर मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. निवृत्तीनंतरही त्या ‘मुनमुन मिसळ’ उद्योगात कार्यरत होत्या. 

खाद्यपदार्थांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या हाताची चीव लागली की, ती सवय सोडणे म्हणजे अशक्यचं असते. चमचमीत मिसळ म्हणून मुंबई आणि  ठाणे जिल्हातील मुनमुनमध्ये खवयांची रांग लागत असे.