वसंत व्हॅली कोव्हिड सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

कल्याण : कल्याण डोंबिवलीमधील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याणमधील वसंत व्हॅली याठिकाणी ५५ ऑक्सिजन बेड्स आणि ९ आयसीयू बेड्स अशा ६४ बेड्सच्या समर्पित कोव्हिड सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राशेजारी आरक्षण असलेल्या नियोजित सुतिकागृहाच्या तीन मजली इमारतीमध्ये एप्रिलमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरु केले होते. आता त्या ठिकाणी सुविधायुक्त कोव्हिड उपचार केंद्र साकारण्यात आले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका खंबीरपणे लढा देत मनपाच्या माध्यमातून क्वारंटाईन सेंटर व कोव्हिड रूग्णालये सुरू करून कोरोना रूग्णांना उपचार सेवा उपलब्ध करून देत आहे.

वसंत व्हॅली विभागात उभारण्यात आलेल्या समर्पित कोव्हिड रुग्णालयाच्या माध्यमातून ५४ ऑक्सिजन बेड्स तसेच ९ आयसीयू बेड्सची व्यवस्था उपलब्द्ध करून देण्यात आली असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने उभारण्ययात आलेल्या या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गास निर्देश दिले व डॉक्टर आणि सपोर्टींग स्टाफचे कौतुक करीत मनोबल वाढवले.

यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यातदेखील आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येतील. महापालिकेतर्फे कोव्हिड रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेतर्फे स्क्रिनिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सह मोठ्या प्रमाणात अँटिजेन टेस्ट, आरटी पीसीआर टेस्ट वाढविण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारचा एक महिन्याचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला आहे. त्याअंतर्गत घरा घरात महिन्यातुन दोनदा ज्या रुग्णांना इतर काही आजार आहेत त्यांची तपासणी करण्यात येईल. यापूर्वी देखील मास स्क्रीनिग करण्यात आली आहे. आता पुन्हा एक महिन्याचा ड्राईव्ह घेण्यात येणार आहे. त्यात राज्य शासन आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी सर्वाच्या सहभागाने हे राबवण्यात येणार असून यामुळे रुग्णांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल असा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान कल्याण परिसरातील कोविड१९ रुग्णांना या रुग्णालयाच्या उपलब्धतेमुळे ताबडतोब तसेच सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देणे शक्य होणार असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढण्यास निश्चितपणे यश मिळेल असे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.
वसंत व्हॅली येथील डेडिकेटेड कोव्हीड रूग्णालयात ५४ ऑक्सिजन बेड, ९बेड आय सी यु, ५ व्हेंटिलेटर, आणि ४ बाय पंप मशीन अशा सुविधा असुन या रूग्णालयात एक्सरे रुम , पॅथालॉजी रूम्, डायनिंग रुम ,डफिंग रुम, रूग्णासाठी वातानुकूलित यंत्रणा, अशा सुविधा आहेत. या

लोकार्पणप्रसंगी आमदार रविंद्र चव्हाण, महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे , सभागुह नेता प्रकाश पेणकर, विरोधी पक्ष नेता राहुल दामले, नगरसेवक जयवंत भोईर,नगरसेवक प्रभुनाथ भोईर, माजी सभागुह नेते रवि पाटील, शिवसेना पदाधिकारी हर्षवर्धन पालांंडे , शहर अभियंता सपना कोळी, मनपा सचिव, संजय जाधव, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, उप अभियंता विघुत भागवत, ब प्रभागक्षेत्र आधिकारी सुहास गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते.