भिवंडीत कोटी रुपयांचा गुटखा जप्त ,ठाणे अन्न सुरक्षा अधिकारी यांची कारवाई 

भिवंडी : भिवंडी तालुका हद्दीतील गोदाम पट्ट्यात प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणावर साठवला जात असून तेथून तो मुंबई ,नवी मुंबई ,ठाणे ,कल्याण भिवंडी या परिसरात विक्री होत असून ठाणे अन्न सुरक्षा अधिकारी यांना भिवंडी तालुक्यातील पुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील कृष्णा कंपाऊंड भूमिका कॉम्प्लेक्स येथील गोदामात गुजरात येथून गुटखा आणला जात असल्याची खबर मिळाली असता अन्न व औषध विभागाचे आयुक्त अरुण उन्हाळे ,कोकण सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी  सहाय्यक आयुक्त भूषण मोरे ,दिगंबर भोगावडे ,अन्न सुरक्षा अधिकारी शंकर राठोड ,संतोष वझरकर ,उत्तरेश्वर बढे ,यांनी सदर ठिकाणी छापा मारला असता तेथील लीलाधर जेठालाल शाह ट्रान्सपोर्ट च्या गोदामात गुजरात येथून दोन ट्रक मधील ३७४ गोणीं मधून आणलेला सुगंधित पान मसाला ,तंबाखू ,विमल जर्दा असा एकूण १ कोटी १ लाख ९० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व २० लाख रुपयांचे दोन ट्रक असा एकूण १ कोटी २१ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ,गोवंडी मुंबई येथील गुटखा व्यापारी फिरोज अब्दुल खान याने हा गुटखा विक्री साठी मागविला असल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांनी दिली असून दोन ट्रक चालकांना ताब्यात घेऊन अन्न सुरक्षा अधिकारी शंकर राठोड यांनी या विरोधात नारपोली पोलिसां कडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .