तृतीयपंथींसोबत केला हळदीकुंकू समारंभ ठाण्याच्या कोपरीत म्हात्रे परिवाराने मांडला नवा पायंडा

मकर संक्रांतीच्या निमित्ताने विविध महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू संभारंभाचे आयोजन होते. यंदा कोपरात एक अनोखा हळदीकुंकू संभारंभ साजरा करण्यात आला. समाजाच्या वेशीवर असलेले वंचित तृतीयपंथीना चक्क निमंत्रण देत घरी हळदीकुंकू संभारंभ साजरा केला. तृतीयपंथी म्हटले की आपल्याला त्यांची भीती वाटते किंवा चार हात त्यांच्यापासून दूर होतो. आधीच त्यांच्या कुटुंबाने त्यांना घराबाहेर काढलेले असते त्यानंतर समाज ही त्यांना नाकारतो. वर्षानुवर्षे या घटकाकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. त्यांना सामान्यांच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजात मानाने वावरण्यासाठी तरुणी प्रज्ञा म्हात्रे हिचे सामाजिक बांधिलकीचे एक पाऊल ठरत आहे. हळदीकुंकू संभारंभात निमंत्रित तृतीयपंथी ओपन मॅरेज करणारी भारतातील पहिली तृतीय पंथी माधुरी सरोदे शर्मा, मुंबई विद्यापीठासन पदवीधर झालेली पहिली तृतीयपंथी श्रीदेवी, शामली, बॉबी हीच आणि तिच्या मैत्रिणींचा समावेश होता. म्हात्रे परिवार आणि तृतीयपंथी यांचा एक अनोखा हळदीकुंकू साजरा झाला.

ठाणे (Thane).  मकर संक्रांतीच्या निमित्ताने विविध महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू संभारंभाचे आयोजन होते. यंदा कोपरात एक अनोखा हळदीकुंकू संभारंभ साजरा करण्यात आला. समाजाच्या वेशीवर असलेले वंचित तृतीयपंथीना चक्क निमंत्रण देत घरी हळदीकुंकू संभारंभ साजरा केला. तृतीयपंथी म्हटले की आपल्याला त्यांची भीती वाटते किंवा चार हात त्यांच्यापासून दूर होतो. आधीच त्यांच्या कुटुंबाने त्यांना घराबाहेर काढलेले असते त्यानंतर समाज ही त्यांना नाकारतो. वर्षानुवर्षे या घटकाकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. त्यांना सामान्यांच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजात मानाने वावरण्यासाठी तरुणी प्रज्ञा म्हात्रे हिचे सामाजिक बांधिलकीचे एक पाऊल ठरत आहे. हळदीकुंकू संभारंभात निमंत्रित तृतीयपंथी ओपन मॅरेज करणारी भारतातील पहिली तृतीय पंथी माधुरी सरोदे शर्मा, मुंबई विद्यापीठासन पदवीधर झालेली पहिली तृतीयपंथी श्रीदेवी, शामली, बॉबी हीच आणि तिच्या मैत्रिणींचा समावेश होता. म्हात्रे परिवार आणि तृतीयपंथी यांचा एक अनोखा हळदीकुंकू साजरा झाला.

तृतीयपंथीच्या मंडळातर्फे हळदी कुंकू हा कार्यक्रम होत असतो. परंतू सामान्य माणसांनी घरात बोलवून हळदी कुंकूचा मान दिला हे पहिल्यांदाच घडले आहे. तृतीयपंथीना एकत्र करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आम्हाला करायचे आहहे त्यासाठी द्या टाळी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. या समारंभात आम्हाला निमंत्रण देऊन जो मान सन्मान केला त्याबाबत प्रज्ञा म्हात्रे यांचे आभार. किंक्रातीला हळदीकुंकू ? असा प्रश्न ज्यावेळी उपस्थित झाला त्यावेळी मी प्रज्ञाला म्हणाले की ज्यावेळी समाजाने आम्हाला स्वीकारले तोच सर्वोच्च मुहूर्त आमच्यासाठी ठरला आणि तो आजचा आहे. — माधुरी सरोदे शर्मा, तृतीपंथी

ज्यावेळी यांच्याकडून मला हळदी कुंकूचे निमंत्रण मिळाले त्यावेळी मला खूप गहिवरून आले.समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची ही पहिली पायरी का असे वाटले. आजही आम्हाला समाज दुर्लक्षित करत आहे. आम्हाला तुमच्यात सामील करून घ्या असे आवाहन यानिमित्ताने आम्ही करीत आहोत. — श्रीदेवी, तृतीपंथी