वनरुपी क्लिनिकच्या वतीने कल्याण डोंबिवली पालिकेत हॅन्ड सॅनिटायझेशनची सोय

कल्याण : कल्याण डोंबिवलीमधील(kalyan dombivali) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी वनरुपी क्लिनिकच्या(one rupee clinic) वतीने कल्याण डोंबिवली तसेच ठाणे परिसरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये हॅन्ड सॅनिटाइज करण्यासाठी मशीन बसविण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारच्या सॅनिटाइज मशीन(hand sanitizer machine) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षात (journalist section) आणि इतर विभागात देखील बसविण्यात आल्या.

वन रुपी क्लिनिकच्यावतीने मुंबई उपनगरमध्ये १९ रेल्वे स्टेशनवर माफक दरात आरोग्य सेवा देण्यात येत असून डोंबिवलीतील पाटीदार भवन आणि सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथील कोविड सेंटरचे व्यवस्थापन देखील करत आहेत. हे करत असतानाच वन रुपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांच्यावतीने ठाणे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात हॅन्ड सॅनिटाइज मशीन देण्यात आल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात मोठ्या संख्येने पत्रकार तसेच राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांची ये जा असते. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हॅन्ड सॅनिटाइज मशीन बसवली असून नितीन शिंपी यांनी ही मशीन कार्यान्वित केली आहे.