लोकांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी त्यांना आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या मोफत द्या – पालांडे यांची आयुक्तांकडे मागणी

कल्याण : कोरोना व्हायरसच्या संकटसमयी नागरिकांंची रोग प्रतिकारकशक्ती वाढण्याच्या दृष्टीकोनातुन आर्सेनिक अल्बम - ३० या होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप रेड झोन व कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना

 कल्याण : कोरोना व्हायरसच्या संकटसमयी नागरिकांंची रोग प्रतिकारकशक्ती वाढण्याच्या दृष्टीकोनातुन आर्सेनिक अल्बम – ३० या  होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप रेड झोन व कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून विनामूल्य उपलब्ध कराव्यात,  अशी मागणी  शिवसेना कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी व्हॉटस् अॅपद्वारे महापालिका.आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव शहरामध्ये वाढत असून नागरिकांची रोग प्रतिकारकशक्ती वाढण्याच्या दृष्टीकोनातुन तसेच आर्सेनिक अल्बम् -३० या गोळ्या मानवी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. आयुष मंत्रालयाने या गोळ्यांना मान्यता दिली आसल्याने तसेच काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असून , पावसामध्ये विविध साथीचे आजार नाकारता येत नाही. तरी या गोळ्या मनपाने कोरोना  उपाययोजना अंतर्गत प्राप्त निधीतून प्रशासनाने जाहीर केलेल्या रेड झोन, कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी पालांडे यांनी केली आहे. या गोळ्या विनामूल्य उपलब्ध करून दिल्या तर नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, अशा आशायचा मेसेज व्हॉटस्अॅप् द्वारे माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे  यांनी आयुक्तांना पाठवला आहे. आयुक्तांनीही या बाबतीत सकारात्मक असल्याचे पालांडे यांना सांगितले आहे.