भाजपचे नेते सदाभाऊ खोत आणि शेतकरी नेते राजू शेट्टी
भाजपचे नेते सदाभाऊ खोत आणि शेतकरी नेते राजू शेट्टी

आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे,मात्र,एकीकडे राज्यात सत्ताधाऱ्याच्या सोबत राहून आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस आणि गोड चहा घ्यायचा आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी मगरीचे अश्रू ढाळायचे अशी दुटप्पी भूमिका सोडा, अशी अनुल्लेखाने टीका भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर केली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावर स्पष्टीकरण दिले. तेव्हा,बोलताना खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टीवर जोरदार टीका केली. याप्रसंगी भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, आ.संजय केळकर आदी उपस्थित होते.

ठाणे (Thane). आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, एकीकडे राज्यात सत्ताधाऱ्याच्या सोबत राहून आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस आणि गोड चहा घ्यायचा आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी मगरीचे अश्रू ढाळायचे अशी दुटप्पी भूमिका सोडा, अशी अनुल्लेखाने टीका भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर केली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावर स्पष्टीकरण दिले. तेव्हा,बोलताना खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टीवर जोरदार टीका केली. याप्रसंगी भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, आ.संजय केळकर आदी उपस्थित होते.

लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र,शेतकऱ्यासाठी आम्ही काम करतो असे खोट बोलून फक्त आमदारकी मिळावी यासाठीच प्रयन्त सुरू असल्याचे दिसत आहे. एका बाजूला सत्तेत राहायचे आणि ऊसाला भाव मिळावा म्हणून आंदोलन करायचे.एकीकडे कारखाना मालकांच्या मांडीला मांडी लावून बसायचे आणि आंदोलनाचे फार्स करायचे.हे उद्योग बंद करा असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.तसेच, अजून किती दिवस साखरेचा गोड चहा घेत राहणार, किती दिवस आमरस खात राहणार ? आता हे सर्व सोडून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे उद्योग बंद करा. सरकारमध्ये असताना आंदोलन कसे काय करता असा सवालही सदाभाऊ खोत यांनी केला.

आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, कर्जमाफीसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. तसेच अनेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचे प्रयत्न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सध्याचे सरकार कुचकामी असून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही. तसेच यांना शेतकऱ्याशी काही घेणे देणे नसून फक्त स्वार्थ साधायचा असल्याची टीका खोत यांनी यावेळी केली.

शेतकऱ्याच्या डोक्यात भ्रम निर्माण केला: सदाभाऊ खोत
केंद्राने केलेल्या अध्यादेशाचे रूपांतर आता कायद्यात झाले आहे.त्याबाबतीत अनेकांनी त्याचे स्वागत केले आहे.तीन कृषी कायद्याच्या माध्यमातून बाजार समितींना स्वातंत्र्य मिळाले आहे.या नवीन कायद्यामुळे शेतकरी आणि बाजार पेठांना फायदा होणार असून परंतु काहींनी त्यांच्या डोक्यात भ्रम निर्माण केल्यामुळे दिल्ली येथील शेतकरी आंदोलन सुरू झाले आहे.या कायद्यामुळे शेतमालाला हमी भाव मिळू शकतो.तसेच ७० वर्ष जुनाट कायदे शेतकार्यावर लादले त्यामुळे राज्यात तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उदाहरण डोळ्यासमोर आहे.काँग्रेसनेच यापूर्वी आणलेले हे कायदे असुनही जाणूनबुजून टीका केली जात आहे.