पाणीच पाणी चोहीकडे – मुसळधार पावसाने ठाणेकरांची उडाली दाणादाण,जनजीवन विस्कळीत

पावसामुळे ठाणेकरांची(Rain In Thane) झोप उडाली असून जागोजागी पाणी साचल्याचे(Water Logging) दिसून आले. आतापर्यंत यावर्षीचा रेकॉर्डब्रेक पाऊस(Record Break RainFall) ठाण्यात बरसला आहे.

    ठाणेः सततच्या दोन दिवस पडणाऱ्या तुफान पावसामुळे ठाणेकरांची(Rain In Thane) झोप उडाली असून जागोजागी पाणी साचल्याचे(Water Logging) दिसून आले. आतापर्यंत यावर्षीचा रेकॉर्डब्रेक पाऊस(Record Break Rain Fall) ठाण्यात बरसला आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः ठाणेकरांना झोडपून काढले असून ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचले होते.

    कळवा, मुंब्रासह, हाजूरी, राम मारुती रोड, कासारवडवली, वागळे इस्टेट, नौपाडा, जांभळी नाका, पिसे, मानपाडातील काही भाग आणि ठाणे पश्चिम बाजारपेठ पाण्याखाली गेले होते. तर ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर गुडघाभर पाणी साचले असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

    ठाण्यात रविवारी आणि सोमवारी पडणाऱ्या पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण ठाणेकरांना आली होती. दोन दिवस पडणाऱ्या या पावसामुळे ठाणे शहराला लागून असलेला शिळ डायघर महामार्ग पाण्याखाली गेले होते. तर सलग ३ दिवस शिळ महामार्ग पाण्याखाली असून वाहनांच्या लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. दिवा शिळ चौक के मुंब्रा खान कम्पाउंड महामार्ग पुर्ण पाण्याखाली गेले होते. मुंब्रा शहरात रहिवाशी भागात पाणी साचण्याचे प्रमाण वाढू लागल्याने आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना बाहेर काढण्यात येत होते.

    या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असताना कळव्यातील घोलाई नगर येथील घटनेच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही घटना घडली नसली तरी मुसळधार पावसामुळे नागरिकाचे प्रचंड हाल झाले आहे.

    ठाणे जिल्ह्याचा आजचा पावसाचा अहवाल (सकाळी ८.३० ते साय. ६.००पर्यंत)
    १) ठाणे -९८.९२ मि.मी.
    २) कल्याण -१२५.४ मि.मी
    ३) मुरबाड -३४.६ मि.मी
    ४) भिवंडी -७९.२५ मि.मी.
    ५) शहापूर -३८.१ मि.मी
    ६) अंबरनाथ -८७.६२ मि.मी
    ७)नवी मुंबई-:१११.३६ मि.मी.