मुरबाडमध्ये वादळी पावसाचा पुन्हा तडाखा, मोठ्या प्रमाणात नुकसान

मुरबाड - वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मुरबाडमध्ये शनिवारी सायंकाळी पुन्हा तडाखा दिला. यात ठिकठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील टोकावडे, माळशेज परिसरात वादळी वारा

मुरबाड –  वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मुरबाडमध्ये शनिवारी सायंकाळी पुन्हा तडाखा दिला. यात ठिकठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील टोकावडे,  माळशेज परिसरात वादळी वारा ,विजांच्या कडकडाटासह शनिवारी संध्याकाळच्या सुमारास गारांचा जोरदार पाऊस झाला.वादळी वा-यामुळे ठिकठिकाणी घरांची कौले, पत्रे उडाली तर काही ठिकाणी घरेही  कोसळली. बऱ्याच ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडून चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. बारागाव खुटल, धसई,,वैशाखरे , झाडघर, माळ पठार, खापरी,नारायणगाव, मोहप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचेही या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.