बदलापुरमध्ये मुसळधार पावसाचं थैमान ; रेल्वे रूळ देखील पाण्याखाली

उल्हास नदी दुथडी भरून वाहत असून गुरुवारी पहाटे या नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती.  नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. परंतु मुसळधार पावसामुळे बदलापूर-वांगणी येथील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे रेल्वेवर त्याचा परिणाम झाला आहे. 

    बदलापूर: गेल्या तीन दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला होता. बुधवारी रात्रीपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे या नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. तसंच उल्हास नदीच्या जवळ असलेले रेल्वेरुळही पाण्याखाली गेले होते.