कल्याणमध्ये हिंदू महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम बांधवांनी केली मदत

कल्याण : लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग ठप्प झाले असताना माणुसकी ठप्प झाली नसल्याचा प्रत्यय कल्याणमध्ये आला. कल्याणमधील ७० वर्षीय हिंदू महिलेच्या अंत्यविधीला मुस्लीम बांधवांनी मदत केल्याने लोकांमध्ये

 कल्याण : लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग ठप्प झाले असताना माणुसकी ठप्प झाली नसल्याचा प्रत्यय कल्याणमध्ये आला. कल्याणमधील ७० वर्षीय हिंदू महिलेच्या अंत्यविधीला मुस्लीम बांधवांनी मदत केल्याने लोकांमध्ये अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे पाहायला मिळाले.  कल्याण पश्चिम येथे राहणाऱ्या प्रभा कलवार या ७० वर्षीय महिला कल्याण पश्चिम भोई वाडा येथे राहतात. त्यांची दोन मुले परदेशात असून एक मुलगा नाशिक येथे कामानिमित्त स्थायिक झाला आहे . त्या आधी ते रोहिदास वाडा येथे वास्तव्यास होते. काल रात्री प्रभा याना अचानक त्रास होऊ लागला त्यांच्या मुलाने याबाबत आजूबाजूच्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही प्रतिसाद न दिल्याने त्यांने रोहिदास वाडा येथील आपले जुने शेजारी असलेले शाकिर शेख यांना फोनवर सांगितले. शाकिर यांनी त्यांच्या मित्रांना घेऊन थेट प्रभा राहत असलेले घर गाठले. परिस्थिती पाहून त्यांनी तात्काळ रिक्षा बोलावून प्रभा यांना रिक्षाने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  त्यानंतर प्रभा यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे कसे असा प्रश्न त्यांच्या मुलांसमोर उभा ठाकला यांनी नाशिक येथून त्यांच्या मोठ्या मुलाला बोलावून घेतले. शाकिर शेख व त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेत आपण अंत्यविधी करू असे सांगत एका हिंदू मित्राकडून अंत्यविधी कसा करतात हे जाणून घेतले व प्रभा यांचा मृतदेह कल्याण रोहिदास वाडा येथील त्यांच्या जुन्या घरी नेऊन तिथे अंत्यविधीची तयारी करून कल्याण पश्चिम बैलबाजार येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार केले.