गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला दाखविला हिरवा झेंडा

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील पडघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कार्यक्रमानंतर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील राजनोली नाका या ठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ २

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील पडघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कार्यक्रमानंतर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील राजनोली नाका या ठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ २ विभागातर्फे रस्त्याने पायी जाणाऱ्या कामगारांसाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत परिवहन विभागाच्या मोफत बस सेवेला हिरवा झेंडा दाखविला. त्या बसमधून प्रवास करणाऱ्या कामगारांना प्रवासा दरम्यान आवश्यक भोजन, बिस्कीट, पिण्याचे पाणी, मास्क साबण आदी वस्तूंच्या किट्स देत देशमुख यांनी बसमधील लोकांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर, महानगरपालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर ,पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे,तहसीलदार शशिकांत गायकवाड , पोलीस अधिकारी उपस्थित होते .  यानंतर राजनोली नाका येथील उड्डाणपुलाखाली झालेल्या छोटेखानी सभेत कोरोनाच्या लढ्यात लढणाऱ्या प्रत्येक घटकासोबत पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले .