कोरोना लढ्यात महापालिकेच्या मदतीसाठी नगरसेवकाने १०० बेड्सचे हॉस्पिटल केले तयार

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव कल्याण डोंबिवलीमध्ये वाढत असून ग्रामीण भागात ही रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेला मदत करण्यासाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी १०० बेडचे संपूर्ण हॉस्पिटल तयार ठेवले

 कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव कल्याण डोंबिवलीमध्ये वाढत असून ग्रामीण भागात ही रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेला मदत करण्यासाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी १०० बेडचे संपूर्ण हॉस्पिटल तयार ठेवले आहे. कोरोना रुग्णांच्या  संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने भविष्यात शासकीय रुग्णालयावर ताण पडण्याची शक्यता आहे. पालिका स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून खाजगी रुग्णालय, डॉक्टर, रुग्णालय कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणमधील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी पुढाकार घेत प्रभागातील १०० बेडचे ऑक्सिलीयम हॉस्पिटल हे डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह संपूर्ण रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी देण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत कुणाल पाटील यांनी कल्याण- डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा केली आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने रुग्णालयाची पाहणी केली असून त्यांच्याकडून हिरवा कंदील दिला असून येत्या काळात आवश्यकता भासल्यास रुग्णालय घेण्यात येईल असे सांगितले गेले आहे. तसेच नगरसेवक कुणाल पाटील यांच्या माध्यमातून मानपाडा पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना  ‘फेस शिल्ड’ हे उच्च दर्जाचे मास्क वाटण्यात आले आहेत.