कल्याणमध्ये घरफोडी, २ लाख ७० हजारांचा ऐवज लंपास

कल्याण(kalyan) पुर्वेतील आडवली ढोकाली परिसरातील गितांजली इनक्युव्य येथे राहणाऱ्या तक्रारदार रमनिक बरनवाल यांच्या बंद घरात घरफोडीचा(house robbery) प्रकार घडला.

कल्याण : कल्याण(kalyan) पुर्वेतील आडवली ढोकाली परिसरातील गितांजली इनक्युव्य येथे राहणाऱ्या तक्रारदार रमनिक बरनवाल यांच्या बंद घरात घरफोडीचा(house robbery) प्रकार घडला. शुक्रवारी रात्री कडी कोयंडा उचकटून घरात शिरत अज्ञात चोरट्याने बेडरूमधील कपाटाचे लॉकर तोडत पाच तोळे  सोन्याची चैन, रोकड असा २लाख ७०हजार रू. किंमतीचा ऐवज चोरला.

याप्रकरणी तक्रारदार रमनिक बरनवाल यांच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भा.दं.वि. ३८० ए४५, ४ए ४५७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या चोरी प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस के गोरे अधिक तपास करीत आहेत.