भिवंडीत कोरोनाबाधीत रुग्णांची शंभरी पार ; एकाच दिवसात आढळले २३ नवे रुग्ण

भिवंडी : भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच बुधवारी शहरात एकाच दिवसात तब्बल २२ तर ग्रामीण भागात एक असे एकूण २३ रुग्ण वाढले आहेत. या नव्या २३ रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित

भिवंडी : भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच बुधवारी शहरात एकाच दिवसात तब्बल २२ तर ग्रामीण भागात एक असे एकूण २३ रुग्ण वाढले आहेत. या नव्या २३ रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या अकड्याने शंभरी पार केली असून आता कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १२१ वर पोहचला आहे. दरम्यान एकाच दिवसात शहरात २२ रुग्ण वाढल्याने मनपा प्रशासनासह पोलीस प्रशासनासमोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे. 

शहरातील २२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १८ रुग्ण हे मुंबई परिसरातून शहरात आले आहेत तर दोन रुग्ण हे मालेगाव वरून आले असून एक रुग्ण झारखंड येथून आला असून एक रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासात आलेला आहे. या नव्या २२ रुग्णांमुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या ६६ वर पोहचली असून त्यामधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर २५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या शहरातील ४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

तर ग्रामीण भागातील काटईबाग गावातील 30 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी या महीलेचे कोरोना अहवाल पोसिटिव्ह आले आहेत. या एका नव्या रुग्णामुळे ग्रामीण भागातील एकूण रुग्णांचा आकडा ५५ वर पोहचला आहे तर १६ रुग्ण बरे झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर ३८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा १२१ वर पोहचला असून त्यापैकी ४१रुग्ण बरे झाले आहेत तर दोन जणांचा मृत्यू झाला असून सध्या ७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

लॉक डाऊन मध्ये मिळालेल्या सूट मुळेभिवंडी  शहरात बाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातच दारू, भाजी , किराणा व फळे खरेदी साठी शहरात रोजच नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. त्यातच परप्रांतीय मजुरांच्या सुटणाऱ्या श्रमिक ट्रेन साठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने भविष्यात भिवंडीत कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दरम्यान शहरांमध्ये मागील पंधरा दिवस पूर्वी इतर शहरात वास्तव्यास होती व आत्ता शहरांमध्ये दाखल झाली आहेत अशा सर्व व्यक्तींची माहिती  महानगरपालिकेच्या आपत्कालीन क्रमांकावर किंवा हेल्थ सेंटरवर किंवा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचेकडे कळवावी अशी विनंती  मनपा आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर यांनी केली आहे .