There is no place to bury the dead; Muslims made a big decision

    नवी मुंबई : वाशी पोलीस चक्क चार महिन्यांपूर्वी दफन केलेल्या मृतदेहाला परत बाहेर काढून त्याची फाॅरेन्सीक लॅब मध्ये तपासणी करणार आहेत. पत्नीने पतीचा अपघातात मृत्यू झाल्याचे दाखवले असले तरी प्रत्यक्षात त्यांची हत्या केल्याचा संशय संबंधीत व्यक्तीच्या बहिणीने व्यक्त केला आहे. यामुळेच आता वाशी पोलीस दफन केलेली बाॅडी बाहेर काढणार आहेत. मयत इसमाचा ५० करोड रूपयांचा इन्शुरन्स आहे.

    मुंबईतून नवी मुबंईत येताना १२ मे रोजी मध्यरात्री फोर्ड इडाव्हेअर गाडीचा वाशी उड्डाणपुलावर कंटेनरला धडकून अपघात झाला होता. जोरदार धडक बसल्याने इंडाव्हेअर गाडीच्या ऐअरबॅग बाहेर निघाल्या होत्या. या धडकेत गाडीत ड्रायव्हर सिटच्या बाजूला बसलेल्या सोहेल मुन्सी यांचा जागीच
    हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. यावेळी गाडीत सोहेल यांची पत्नी नबिहा मुन्शी, मुलगी आणि मुलगा बसलेले होते. त्यांना कोणतीच इजा झाली नाही. अपघातानंतर त्यांना एमजीएम रूग्णालयात आणले असता त्यांना मृत्य घोषीत केले होते.

    सोहेल मुन्शी याच्या पत्नीचे बाहेर संबंध असल्याचा आरोप त्याच्या बहिणीने केला आहे. सोेहेल याचा ५० करोड रूपयांचा इन्शुरन्स आहे. तसेच काही प्राॅपर्टी असल्याने यासाठीच आपल्या भावाची हत्या केली असल्याचा संशय सोहेल यांच्या बहिणीला आहे. यामुळे आपल्या भावाचा अपघातात मृत्यू झाला नसून तो घातपात असल्याचा संशय आल्याने सोहेल यांच्या बहिणीने वाशी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

    हत्येचा संशय व्यक्त करण्यात आल्याने चार महिन्यांपूर्वी दफन केलेला मृत्यदेह परत बाहेर काढण्यात येणार आहे. ठाणे तहसीलदार यांच्या उपस्थित तो बाहेर कांढून जेजे हाॅस्पीटल आणि कलिना येथील फाॅरेन्सिक लॅब आणि हिस्टो पॅथाॅलाॅजीला पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.