demolition in kalyan

कल्याणच्या अ प्रभाग क्षेत्रातील आंबिवली, अटाळी, मोहने, टिटवाळा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज कारवाई करण्यात आली. अ प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने धडक कारवाईचा बडगा(illegal building demolition in kalyan) उचलित हातोडा चालवित ही बांधकामे भुईसपाट केली.

कल्याण:  कल्याणच्या अ प्रभाग क्षेत्रातील आंबिवली, अटाळी, मोहने, टिटवाळा परिसरातील अनाधिकृत रूम्स, अनधिकृत दुकानाचे गाळे, अनधिकृत जोते, अनाधिकृत तळमजला +२ माळे असलेले आर सी सी बांधकाम, अनधिकृत पत्र्याचे शेड, चिकण मटनच्या टपऱ्यांवर  अ प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने धडक कारवाईचा बडगा(illegal building demolition in kalyan) उचलित हातोडा चालवित ही बांधकामे भुईसपाट केली.

अ प्रभागातील टिटवाळ्यातील वाडी परिसरातील ३ अनधिकृत रूम , तसेच ६ अनधिकृत दुकाने , टिटवाळा मंदिर रोड चिकन मटण विक्रीची ७ अनधिकृत टपऱ्या, आंबिवली येथील अनधिकृत पत्र्याचे शेड, अटाळी येथील अनाधिकृत स्लॅप बांधकाम, अटाळी येथील पाण्याच्या टाकीजवळ ५ अनधिकृत जोते, अटाळीतील ७ अनधिकृत रुम , मोहने येथे तळमजला + २माळे असलेली आर. सी. सी अनधिकृत बांधकामावर प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाईचा बडगा उचलत २ दिवसीय मोहिमेत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली .

या कारवाईसाठी १ जे.सी.बी., अनधिकृत बांधकाम विभागचे ४ पोलीस कर्मचारी तसेच अनधिकृत बांधकाम पथकाचे १० कर्मचारी, असा फौज फाटा होता. अ प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने केलेल्या अनाधिकृत बांधकामावरील कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचा या कारवाईने धाबे दणाणले आहेत.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उप आयुक्त सुधाकर जगताप यांच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा सुरु राहणार असुन अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यावर एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हे दाखल करीत कारवाई सुरू असणार असल्याचे प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले.