भिवंडीमध्ये अवैध हुक्का पार्लरचा सुळसुळाट

भिवंडी:भिवंडी(bhivandi) शहर व ग्रामीण क्षेत्रात अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर(hukka parlour) सुरू असल्याने शाळकरी व कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी हुक्का पार्लरमध्ये जाऊन नशा करीत असल्याने शहरात चोरीचे प्रमाण वाढल्याचा आरोप युवासेनेने  केला आहे. हे अवैध धंदे चालवाणाऱ्यांना स्थानिक पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याने हुक्का पार्लरवर कारवाई होत नसल्याने तरुण पिढी बरबाद होत असल्याने पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी लक्ष घालावे, अशी मागणी युवासेनेने केली आहे.

भिवंडी पोलीस परिमंडल  अंर्तगत येणाऱ्या पोलीस स्टेशन कोनगांव , नारपोली , निजामपुरा, शांतिनगर , शहर पोलीस स्टेशन  व भोईवाडा पोलीस स्टेशनच्या अंर्तगत ठिकठिकाणी अवैध हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू आहे असल्याचे आरोप युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे

भिवंडी उपयुक्त राजकुमार शिंदे यांच्या अंतर्गत येणाऱ्या शांतिनगर पोलीस ठाण्यामधील औचित पाडा येथील फरीद आर्केड बिल्डिंगच्यासमोर बुलेट ढाबामध्ये स्मोक सिटी, दांडेकर वाडी शिवास हॉटेलच्या मागे,आमपाडा बकरा बाजार, काशिमपुरा कब्रिस्तानच्या मागे , नागांव हनुमान मंदिरच्या मागे, जब्बार कम्पाउंड तलावा जवळ असलेला हुक्का पार्लर बंद करण्याची मागणी केली आहे. कोरोनामुळे शाळा व कॉलेज बंद असल्याने तरुण पिढी हुक्का पार्लरमुळे वाया जात असल्याने हे अवैध हुक्का पार्लर त्वरित बंद करण्याची मागणी युवासेनेने केली असून यासंदर्भात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.