stone crushing

भिवंडी(bhivandi) तालुक्यातील मौजे शिरोळे(mauje shirale) येथील खाण मालकाने(mine owner) वर्षभरापासून जिल्हाधिकाऱ्यांकडून दगड उत्खननासाठी ब्लास्टिंगचा परवाना घेऊन त्या आधारे सुमारे १० हजार ब्रासचे अवैधपणे दगड उत्खनन केले. तसेच त्याची कोट्यवधींची रॉयल्टी सरकारी तिजोरीत न भरता शासनाला चुना लावल्याची घटना समोर आली आहे.

भिवंडी: भिवंडी(bhivandi) तालुक्यातील मौजे शिरोळे(mauje shirale) येथील खाण मालकाने(mine owner) वर्षभरापासून जिल्हाधिकाऱ्यांकडून दगड उत्खननासाठी ब्लास्टिंगचा परवाना घेऊन त्या आधारे सुमारे १० हजार ब्रासचे अवैधपणे दगड उत्खनन केले. तसेच त्याची कोट्यवधींची रॉयल्टी सरकारी तिजोरीत न भरता शासनाला चुना लावल्याची घटना समोर आली आहे.त्यामुळे शासनाने खाण मालकावर दंडात्मक कारवाई करून सुमारे १५ कोटींची रॉयल्टी तात्काळ वसूल करावी, अशी मागणी(demand to take action) शांताराम मते यांनी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

मौजे शिरोळे गावातील खाण मालक गोविंद मते यांनी त्यांच्या मालकीच्या सर्वे नं.११९/ ब क्षेत्र १.२८.०० ,पोट खराबा 0 – ५ ,आकार १.१४ रुपये तसेच सर्वे नं.११९ / ७ क्षेत्र १.६१.००.पोख.०.०४.०० या जागेच्या खाणीतून दगड उत्खनन करण्यासाठी वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातून ब्लास्टिंगचा परवाना घेतलेला आहे. त्या आधारे त्यांनी आजपावेतो सुमारे १० हजार ब्रास दगडाचे अवैधपणे उत्खनन केलेले आहे.मात्र या दगड उत्खनन व विक्रीसाठी लागणारे स्वामित्वधन (रॉयल्टी ) सुमारे १५ कोटी रुपयांपैकी एकही रुपयाची रॉयल्टी शासनाच्या तिजोरीत भरलेली नाही.

वर्षभरापासून दगड उत्खनन केले जात असल्याने जमिनीवर ५० मीटर लांब व ६० मीटर रुंद तर ५ मीटर खोलीची जमिनीवर खाण निर्माण झाली आहे. या दगड उत्खननासाठी गोविंद मते यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही अथवा उत्खनन केलेल्या दगडाची रॉयल्टी भरलेली नाही. या अवैध दगड खदाणीच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याकडे सरकारी अधिकाऱ्यांनी नेहमीच डोळेझाक केल्याने शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या अवैध दगड खाणीची तात्काळ चौकशी करून खाण मालकावर दंडात्मक कारवाई करून शासनाचे कोट्यवधींचे बुडालेले स्वामित्वधन (रॉयल्टी)वसूल करण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार शांताराम मते यांनी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.