भिवंडीत अनलॉकमुळे बाजारपेठा  उघडल्या,नागरीकांनी केली गर्दी

भिवंडी : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग व्यवसाय लाँकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे व्यापारी वर्गासह सर्व त्रस्त होते. अखेर शासन आदेशानुसार ७७

भिवंडी : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग व्यवसाय लाँकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे व्यापारी वर्गासह सर्व त्रस्त होते. अखेर शासन आदेशानुसार ७७ दिवसानंतर लॉकडाऊन स्थितील करून अनलॉक मिशन बिगीनं अग्रेन सुरु झाल्याने शहरातील अत्यावश्यक सेवेत नसलेले दुकान व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिल्याने भिवंडी पालिका आयुक्तांचे आदेशानुसार व्यापाऱ्यांनी आपली दुकान उघडून व्यवसाय सुरु केला.यावेळी नागरिकांनी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

कोरोना फैलाव रोखण्यासाठी शासन आदेशानुसार सर्वत्र लाँकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद करण्यात आले होते.आता ७७ दिवसांच्या कालावधीनंतर भिवंडीतील विविध प्रकारची दुकाने अटी-शर्तींसह सुरु करण्याला पालिका आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांनी लेखी पत्राद्वारे मान्यता दिली आहे. सदर दुकाने सुरु करण्यासाठी सम-विषम तारखांचा निकष घालून देताना मोठी व्यापारी संकुले व मॉल्स मात्र बंदच राहतील, असे आदेश दिले आहे. शिवाय, दुकानांमध्ये गर्दी होऊ नये, फिजिकल सोशल डिस्टन्सिंगचे पालन याची काळजी दुकानचालकांनाच घ्यावी अशा सुचनात्यांनी प्रभाग समिती अधिकाऱ्या माफँत दिल्याचे सांगितले.त्यामुळे आज पासून शहरातील विविध दुकान व बाजारपेठ सुरू झाले आहेत.त्यामुळे नागरिकांनी रेनकोट, छत्री सह विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. दुकानादार विविध सवलती देऊन, अटी-शर्तींवर काही व्यवसाय सुरु करण्यासंबंधी निर्देश देण्यात आले आहे.