भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत प्रतिमा जाळली

भिवंडी - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. भिवंडी शहरातील जकात नाका

 भिवंडी – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. भिवंडी शहरातील जकात नाका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गोपीचंद यांच्या प्रतिमेला महिलांकडून जोडे मारण्यात आले. जोरदार घोषणा देत मुर्दाबाद चे नारे लावले व गोपीनाथ पडळकर यांची प्रतिमा जाळण्यात आली 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली व जर पडळकर यांच्यात हिंमत असेल तर भिवंडीत येऊन दाखवावं ,किंवा मुंबई नाशिक महामार्गाने प्रवास करून दाखवावं त्यांच्या तोंडाला नक्की काळ फासू आशा ईशारा कार्यकर्त्यानी दिला आहे. पवारचा अपमान आम्ही सहन करणार नाही किंबहुना शरद पवार हे आमचे दैवत असल्याचे स्पष्ट केलं आहे या वेळी महिला अध्यक्ष स्वाती कांबळे ,भिवंडी शहर राष्ट्रवादी अध्यक्ष भगवान टावरे , अनिल फडतरे ,यांच्या सह शेकडो कार्यकते उपस्थित होते