kdmc

कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) हद्दीतील ३० वर्षाहून जुन्या इमारतीना स्ट्रक्चरल ऑडिट (Audit)  करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. या नोटिशीच्या अनुषंगाने सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले असून यात २८४ इमारती (Building)  धोकादायक तर १८७ इमारती अति धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) हद्दीतील ३० वर्षाहून जुन्या इमारतीना स्ट्रक्चरल ऑडिट (Audit)  करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. या नोटिशीच्या अनुषंगाने सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले असून यात २८४ इमारती (Building)  धोकादायक तर १८७ इमारती अति धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली आहे.

या सर्व अनधिकृत इमारती मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून इमारती रिकाम्या कराव्यात अशा आशयाच्या नोटिसा यापूर्वीच देण्यात आल्या असून भिवंडीसारखी दुर्घटना आपल्या शहरात घडू नये यासाठी अति धोकादायक इमारती मधील रहिवाशांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी तातडीने घरे रिकामी करावीत असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.