कोशिंबे गावात दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करून टाकला दरोडा

दरोडेखोरांनी केलेल्या जबर प्राणघातक हल्ल्यात महादू गोडसे या वृद्ध घरमालकाच्या शरीरावर प्राणघातक वार झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या दरोडेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने गोडसे कुटुंबीय अत्यंत मानसिकदृष्ट्या भयभीत झाले आहेत. व यासंबंधी दरोडेखोर हल्लेखोरांविरोधात फिर्यादी महादू गोडसे यांनी पोलीस स्टेशन गणेशपुरी येथे फिर्याद नोंदवली आहे.

भिवंडी : मौजे कोशिंबे गावातील महादू चाहू गोडसे व त्यांच्या पत्नी ह्या त्यांच्या गावाबाहेरील असलेल्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असताना अचानक काही दरोडेखोरांनी घराच्या मागील दरवाजातून तलवारी, भाले या हत्यारांसहित प्रवेश करून महादेव गोडसे व त्यांच्या पत्नी वृद्ध दाम्पत्यावर दरोडेखोरांनी त्यांच्या हातातील धारदार तलवारीने वार करून, त्यांचे हात पाय साडीच्या सहाय्याने बांधून ठेवले. (robbers attacked an elderly couple) व या दरोडेखोरांनी या वृद्ध दाम्पत्यास शांत बसण्याकरिता त्यांच्या मानेवर हत्यारे रोखून धरली होती. त्यानंतर या दरोडेखोरांनी महादू गोडसे व त्यांच्या पत्नी यांच्याकडील गंठण, कुडी व इतर सोने हिसकावून रोख रक्कम पंचवीस हजार रुपये जबरदस्तीने मागून घेतली. व त्यांनी अजून काही सोने व पैसे मिळवण्याचा प्रयत्नात घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त केल्या.

ह्या दरम्यान दरोडेखोरांनी केलेल्या जबर प्राणघातक हल्ल्यात महादू गोडसे या वृद्ध घरमालकाच्या शरीरावर प्राणघातक वार झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या दरोडेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने गोडसे कुटुंबीय अत्यंत मानसिकदृष्ट्या भयभीत झाले आहेत. व यासंबंधी दरोडेखोर हल्लेखोरांविरोधात फिर्यादी महादू गोडसे यांनी पोलीस स्टेशन गणेशपुरी येथे फिर्याद नोंदवली आहे. व त्या अनुषंगाने संबंधित पोलीस प्रशासनाकडून भा. द. वी. कलम ३९४, ३४२ याप्रमाणे अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत व पुढील तपास, तपास अधिकारी रवींद्र आव्हाड (पो. उ. नि.) हे करत असल्याची माहिती मिळाली आहे.

वरील घटनेतील दरोडेखोरांमुळे पालखणे (गणेशपुरी) हद्दीतील कोशिंबे गावानजीकच्या आसपासची पंचक्रोशीतील गावागावांत एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थता जाणवत असल्याचे निदर्शनास येत आहे. व तसेच लवकरात लवकर या संबंधित दरोडेखोरांचा सुगावा लावण्यात यावा त्या दृष्टीने संबंधित संपूर्ण पंचक्रोशीतील परिसरात मा. पोलीस प्रशासनाने रात्री-अपरात्री गस्त घालण्याचीही मागणी परिसरातील नागरिकांनी पालखने बीट (गणेशपुरी) पोलीस प्रशासनाकडे केली आहे.