पालघर जिल्ह्यात १६ तासांत ४८ नव्या कोरोनाबाधितांची भर, कोरोनारुग्णांचा आकडा २६७७ वर

पालघर : पालघर जिल्ह्यात १६ तासांत ४८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज दुपारी मिळालेल्या आकडेवारी नुसार काल संध्याकाळी ६ वाजताच्या नंतर पासून ते आज सकाळी १० वाजेपर्यंत ४८ नव्या रुग्णांची भर

 पालघर :  पालघर जिल्ह्यात १६ तासांत ४८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज दुपारी मिळालेल्या आकडेवारी नुसार काल संध्याकाळी ६ वाजताच्या नंतर पासून ते आज सकाळी १० वाजेपर्यंत ४८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातली कोरोना विषाणू बधितांची संख्या ही २६७७ वर पोहचली आहे. त्यापैकी आतापर्यंत ९८ जणांचे कोरोना विषाणूनं बळी घेतलेत. आतापर्यंत १५४० जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर जिल्ह्यात सध्या १०२२ इतक्या ऍक्टिव्ह केसेस आहेत.

४८  नव्या रुग्णांपैकी मोखाडा तालुक्यातले ८, वाडा तालुक्यातले ५ आणि जव्हार तालुक्यातले ५ असे १८ रुग्ण हे जव्हार, मोखाडा आणि वाडा या तीन तालुक्या मधले आहेत. १८ रुग्णांत ४ महिला तर १४ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. 

मोखाडा तालुक्या आढळून आलेल्या ८ नव्या रुग्णांपैकी १ रुग्ण हे मोरांडा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.