पालघर जिल्ह्यात रात्रभरात आढळले ८ नवे कारोनाबाधित रुग्ण

पालघर : आज (दि १ जून) सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारी नुसार पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळी ६ वाजेपासून ते आज सकाळी १० वाजेपर्यंत एकूण ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात

 पालघर : आज (दि १ जून)  सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारी नुसार पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळी ६ वाजेपासून ते आज सकाळी १० वाजेपर्यंत एकूण ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पालघर तालुक्यातल्या ५ जणांचा तर डहाणू तालुक्यातल्या २ जणांचा आणि वसई तालुक्यातल्या १ जणाचा समावेश आहेत.

पालघर तालुक्यात जांभळेपाडा (दहिसर) इथं १, दातीवरे इथं २ , धुकटन इथं १, बोईसर इथं १ असे ५ नवे रुग्ण आढळून आलेत.तर डहाणू तालुक्यात पटेल पाडा इथं १, सिद्धी संकल्प बिल्डींग ( सरावली) इथं १ असे २ नवे रुग्ण आढळून आलेत. तसचं वसई तालुक्यातल्या कळंब इथं १ रुग्ण आढळून आला आहे.

८ नव्या रुग्णांपैकी ४ जणांना SARI/ILI लक्षणं आढळून आल्यानं त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात आता कोव्हीड १९ च्या रुग्णांची संख्या ८५५ वर पोहचली आहे. त्यापैकी २९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ४८६ ऍक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत बऱ्या झालेल्या ३४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात जास्त कोव्हीड-१९ च्या रुग्णांची संख्या ही रेड झोन मध्ये असलेल्या वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात आहे. आणि ती ७५२ इतकी आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात जास्त २५ जणांचे मृत्यू हे देखील वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रातचं झाले आहेत.

जिल्ह्यातली सद्यस्थिती :

पालघर तालुका – ४१ ( २ मृत्यू )

डहाणू तालुका – १९

जव्हार तालुका – १

वाडा तालुका – ५

वसई ग्रामीण – ३७ ( १ मृत्यू )

वसई – विरार महानगरपालिका क्षेत्र – ७५२ ( २५ )