corona

पनवेल : रायगड जिल्ह्यात शुक्रावर ९ ओक्टोंबर  रोजी ३२९   नवीन रुग्ण   आढळले  असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४७३  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत.रायगड जिल्ह्यात  कोरोंनाच्या रुग्णांची  एकूण संख्या ४९९६६  झाली असून जिल्ह्यात १४१७  जणांचा मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्यात शुक्रवारी  कोरोनाचे ३२९ नवीन रुग्ण सापडले असून ४७३ जणांनी कोरोंनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २४७    नवीन रुग्ण आढळले   असून पनवेल महापालिका क्षेत्रात १९६ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज रोहा ३ , खालापूर २ , पनवेल महापालिका क्षेत्रात १ ,अलिबाग आणि महाड येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .
पनवेल ग्रामीण मध्ये ५१ , आलबाग २३ , उरण १० , कर्जत ८ , खालापूर ७ , माणगाव ७ ,  पेण ५ , महाड ५  ,सुधागड ४ , श्रीवर्धन ४ , रोहा ३  ,मुरुड ३ , म्हसळा  ,तळा  आणि पोलादापूर   मध्ये एक  रुग्ण  आढळले  आहे.  रायगड जिल्ह्यात  १,७६,५८१  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ४९,९६६   पॉझिटिव्ह आल्या आहेत २०७  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर ४५,२३०  जणांनी मात केली असून ३३१९  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात १४१७  जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे