
कोरोनाच्या काळात हजारोच्या संख्येने वाढीव वीज बीले आल्याने या आजीबाईना संध्याकाळ झाली की घरातील लाईट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आजीबाईनी वाढीव वीज बिल आल्याची एकप्रकारे धास्ती घेतली आहे.
- वाढीव वीजबिलाच्या धोक्याने, घरात अंधारच बरा
ठाणे : कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन काळात गोरगरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली असतानाच, भरमसाट आलेल्या वीजबिलाने त्यांच्या समोर कोणतीच आशा उरलेली नाहीये. ठाण्याच्या चंदनवाडी परिसरात राहणाऱ्या आजीबाईना वाढीव वीज बिलाचा धक्का घेतला असल्याने या घरातील सर्व लाईट तब्बल २ महिने बंद ठेवण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लॉकडाऊनपूर्वी महिना सातशे आणि आठशे रुपये येणारी बीलं एकदम हजारात येऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. असेच एक प्रकरण आज समोर आले ज्यात लक्ष्मी सूर्यवंशी वृद्ध महिला आपल्या लेकीसोबत रहात असून अनेक निराधार आणि भटक्या प्राण्यांची देखभाल करत आहे. सदर महिलेकडे अनेक जख्मी कुत्रे, मांजरं आणि पक्षी आहेत.
घासातला घास काढून आणि इतर दानशूर व्यक्तीच्या मदतीने या आजीबाई सर्व गाडा ओढत आहे. परंतु लॉकडाऊन मध्ये तिला चक्क दहा हजारांचे वीजबील आल्याने तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात हजारोच्या संख्येने वाढीव वीज बीले आल्याने या आजीबाईना संध्याकाळ झाली की घरातील लाईट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आजीबाईनी वाढीव वीज बिल आल्याची एकप्रकारे धास्ती घेतली आहे.
जनतेची ही व्यथा पाहता राज्यातील ठाकरे सरकारच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुरुवारी संपूर्ण राज्यात निषेध मोर्चे काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु सरकारने दडपशाहीचे तंत्र वापरून हे आंदोलन मोडून काढले. सरकार आणि ऊर्जामंत्र्यांनी सामान्य नागरिकांचा हा त्रास समजून घेऊन उपाययोजना करावी असे आवाहन मनसे नेता महेश कदम यांनी केले. दरम्यान या संपूर्ण प्रकार कदम यांनी उघडकीस आणला असून महावितरण कंपनीने याचा मीटर कापला की, मनसे स्टाईल ने आंदोलन करू असा इशारा यावेळी महेश कदम यांनी दिला.