गेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू

अंबरनाला १८ रुग्ण वाढले असून एक मृत्यू झाला आहे. तर बदलापूरमध्ये १२ रुग्णांची आज वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील गांवपाड्यात ३६ रुग्ण सापडले असून एकाही मृत्यूची नोंद नाही. उल्हासनगरमध्ये ९ रुग्ण वाढ झाली असून ३ मृत्यू झालेत.

    ठाणे : ठाणे जिल्ह्यातील काही भागांत कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून आले आहेत.जिल्ह्यातील महापालिकां, गावपातळीवर ३५० कोरोना रुग्णांची वाढ झाली असून आठ जणांचा मृत्यू शनिवारी झाला आहे. ठाणे शहरात ५६ रुग्णांच्या वाढीसह एकही मृत्यू नाही. कल्याण डोंबिवलीला ८७ रुग्ण वाढीसह एक मृत्यू झाला आहे.

    अंबरनाला १८ रुग्ण वाढले असून एक मृत्यू झाला आहे. तर बदलापूरमध्ये १२ रुग्णांची आज वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील गांवपाड्यात ३६ रुग्ण सापडले असून एकाही मृत्यूची नोंद नाही. उल्हासनगरमध्ये ९ रुग्ण वाढ झाली असून ३ मृत्यू झालेत. भिवंडी परिसरात एकही रुग्ण आणि मृत्यू नाही. मीरा भाईंदरला ६४ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू झाला नाही.

     पुणे शहरामध्ये २६० नवीन रुग्णांची नोंद

    आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची  संख्या अडीच हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात पुणे शहरामध्ये २६० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.