naresh mhaske

सद्यस्थितीत ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाच्या माध्यमातून अंदाजे ११३ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. वास्ताविक पाहता स्टेम प्राधिकरणामध्ये ठाणे महानगरपालिकेचे योगदान मोठे आहे. ठाणे महानगरपालिकेला वाढीव पाणीपुरवठा करण्यामध्ये स्टेमकडून कुचराई करण्यात येते आहे.

ठाणे : नुकत्याच झालेल्या बैठकीत ठाणे महापालिकेला १० एमएलडी वाढीव पाणी (Increase water to Thane ) असे आदेश महापौर नरेश म्हस्के (Mayor Naresh Mhaske) यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर स्टेमचे अधिकाऱ्यांनी महापौर म्हस्के यांची गुरुवारी भेट घेतली दरम्यान ठाण्याला पाणी वाढवून द्या नाहीतरी जेसीबी लावून स्टेम कार्यालय (STEM office) उखडणार असा इशारा यावेळी नरेश म्हस्के यांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांना दिला. नक्कीच ठाण्याला जास्त पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करतो, असे म्हणत अधिकारी निघून गेले. दरम्यान ठाण्याला मिळणाऱ्या पाण्यावरून महापौर संतापले असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत ठाण्याला जास्त पाणी मिळावे म्हणून कोणी बोलत नव्हते मात्र महापौर म्हस्के यांनी दम देऊन सच्चा शिवसैनिकांचे दर्शन घडवले.

सद्यस्थितीत ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाच्या माध्यमातून अंदाजे ११३ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. वास्ताविक पाहता स्टेम प्राधिकरणामध्ये ठाणे महानगरपालिकेचे योगदान मोठे आहे. ठाणे महानगरपालिकेला वाढीव पाणीपुरवठा करण्यामध्ये स्टेमकडून कुचराई करण्यात येते, याचा परिणाम ठाण्यातील पाणी वितरण व्यवस्थेवर होत आहे. इतर महानगरपालिकांना वाढीव पाणी पुरवठा करण्यात येतो तर, ठाणे महापालिकेला वाढीव पाणीपुरवठा का करण्यात येत नाही असा सवाल देखील महापौरांनी यावेळी उपस्थित केला.

स्टेम प्राधिकरण मार्फत ठाणे, भिवंडी, मिरा भाईंदर आणि ठाणे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो. त्यामधून ठाणे महापालिका जास्त आणि वेळेवर पैसे भरत असताना सुद्धा महापालिकेला कमी पाणी मिळत असल्याच्या कारणावरून म्हस्के यांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांना बुधवारी शांत मार्गाने तर गुरुवारी संतापून खडेबोल सुनावले.