वाडा तालुक्यात संस्थात्मक विलगीकरणासाठी १७२ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोय करण्यासाठी समिती स्थापन – तहसीलदार कदम

वाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा नगर पंचायत हद्दीत आणि वाडा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींपासून कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही यासाठी त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली

वाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा नगर पंचायत हद्दीत आणि वाडा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींपासून कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही यासाठी त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यासाठी  संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी वाडा तालुक्यातील १७२ जिल्हा परिषद शाळांमध्ये सोय करण्यात येणार आहे.यासाठी वाडा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा वाडा तहसीलदार उध्दव कदम यांच्या अधिकारात ग्रामपंचायत स्तरावर व नगरपंचायत स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.

वाडा तालुक्यात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे तिन्ही रुग्ण दरम्यानच्या काळात वाडा शहरात दोन आणि ग्रामीण भागात एक असे हे जिल्हा बाहेरील प्रवासातून आले होते.या तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १६ जणांच्या तपासणी नमुन्यापैकीं  १४ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले असून २ जणांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याचे वाडा तहसीलदार उध्दव कदम यांनी बोलताना सांगितले.

या  अगोदर एका पालघर जिल्ह्यातील गडचिंचले या कथित तिहेरी हत्याकांडातील अटक आरोपी हे वाडा पोलीस ठाण्यात एका कोठडीत ठेवण्यात आले होते. यातील एका आरोपीला कोरोनाची लागन झाल्याने खळबळ उडाली होती.त्यामुळे त्याच्या संपर्कातील पोलीस कर्मचारी,इतर आरोपी आणि अन्य व्यक्तींची तपासणी नमुने घेण्यात आले होते. यात बहुतांशी लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

वाडा तालुक्यात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवणे आणि त्या बाबतचा सर्व तपशील हा गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना सादर करणे यासाठी गावातील ग्रामपंचायत सरपंच व तलाठी,ग्रामसेवक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,आरोग्य सेवक (पुरुष) आदीं सदस्य यांची समिती नेमली आहे.तर नगरपंचायत स्तरावर सर्व वार्डातील नगरसेवक आणि मुख्याधिकारी आदी समिती असेल. ग्रामस्तरावर दररोजचा तपशील गटविकास अधिकारी व तहसिलदार यांना सादर करण्यात येणार आहे.तर नगरपंचायतीच्या भागातील तपशील हा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना कळविणे आहे.

संस्थातमक विलगीकरणासाठी तालुक्यातील १७२ जिल्हा परिषदेच्या शाळा वापरण्यात येणार आहे.या विलगीकरनात ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तीचं जेवणाची सोयी सुविधा सेवाभावी संस्था,तरुण मित्र मंडळ,बचतगट आदींची मदत घ्यावी.या ठिकाणी सोशल अंतर, सॅनिटायझर आणि स्त्री आणि पुरुष यांची स्वतंत्र व्यवस्था असावी, असे या समितीने काम पहावयाचे आहे.