प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मीरा भाईंदरमध्ये खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचारांदरम्यान नागरिकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालय आणि लॅबच्या संगनमताने रुग्णांना कोरोना नसतानाही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट देऊन नागरिकांची फसवणूक सुरू होती.

    ठाणे : मीरा भाईंदरमध्ये खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचारांदरम्यान नागरिकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालय आणि लॅबच्या संगनमताने रुग्णांना कोरोना नसतानाही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट देऊन नागरिकांची फसवणूक सुरू होती.

    मीरा भाईंदर शहर ‘कोरोनामुक्ती’कडे वाटचाल करत असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ऑर्किड रुग्णालय, स्वस्तिक आणि अपूर्व लॅब लोकांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे फसवे रिपोर्ट देत असल्याची माहिती मिळाल्याने महानगरपालिकेने यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.