उद्या राष्ट्रीय महामार्ग बंद राहणार, ठाणे ते दिवा रेल्वे मार्ग जोडण्यासाठी लोखंडी पूलाचं काम

शिळफाटा येथून मुंब्रा बायपास मार्ग खारेगाव टोल नाक्याकडे जाणारी व खारेगाव टोलनाका येथून मुंब्रा बायपासकडे येणारी हलकी व जड वाहतूक राष्ट्रीय माहामार्ग ४८ यावर रविवारी २४ तास बंद ठेवण्यात आली आहे. ती इतर मार्गांवरून वळवण्यात आली आहे.

    ठाणे : मुंब्रा रेतीबंदर या ठिकाणी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ठाणे ते दिवा रेल्वे मार्ग जोडण्यासाठी उद्या (रविवार) लोखंडी पूल टाकण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय माहामार्ग ४८ हा रेतीबंदर रेल्वेपूल रविवारी कामाच्या २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाकडून या मार्गावरील वाहतूक दुसर्‍या मार्गावरून वळवण्यात आली आहे.

    शिळफाटा येथून मुंब्रा बायपास मार्ग खारेगाव टोल नाक्याकडे जाणारी व खारेगाव टोलनाका येथून मुंब्रा बायपासकडे येणारी हलकी व जड वाहतूक राष्ट्रीय माहामार्ग ४८ यावर रविवारी २४ तास बंद ठेवण्यात आली आहे. ती इतर मार्गांवरून वळवण्यात आली आहे.

    जेएनपीटीकडून शिळफाटा मार्ग, मुंब्रा बायपासने नाशिक, ठाणे ग्रामीण, भिवंडीकडे जाणारी हलकी व जड अवजड वाहने ही कळंबोली सर्कलवरून पनवेल-मुंब्रा रोडने रोडपाली सिग्नल अथवा नावाडेफाटा वरून उजवीकडे वळण घेऊन तळोजा एमआयडीसी-आय जी पी एल नाक्यावरून पुढे पाईपलाईन रोडने कल्याण चक्की नाका-पत्री पूल-गोविंदवाडी बायपास-दुर्गाडी सर्कलवरून इच्छित स्थळी जाता येणार आहे.