iron rod

बल्याणी भागात असलेल्या एका पाळीव कुत्रीच्या गुप्तभागात एका नराधमाने सळई घुसवून तिला जखमी केल्याची(iron rod in dog`s private part) घृणास्पद घटना घडली आहे. या घटनेबद्द्ल परिसरात संताप व्यक्त केला जात असून प्राणीमित्र संघटनांनी अशा नीच कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कल्याण : टिटवाळा(titwala) ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बल्याणी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. बल्याणी भागात असलेल्या एका पाळीव कुत्रीच्या गुप्तभागात एका नराधमाने सळई घुसवून तिला जखमी केल्याची(iron rod in dog`s private part) घृणास्पद घटना घडली आहे. या घटनेबद्द्ल परिसरात संताप व्यक्त केला जात असून प्राणीमित्र संघटनांनी अशा नीच कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कुत्रा मालकांच्या तक्रारीवरून कुत्रीला अशा प्रकारे जखमी करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बल्याणी परिसरात पाण्याच्या टाकी जवळ राहणारे संतोष खराडे हे गेल्या दहा वर्षांपासून इंग्लिश कॉकटेल जातीची तांबूस रंगाचे कुत्री ते पाळत आहेत. मात्र याच परिसरात राहणाऱ्या भुरट्या चोरी आणि अंमली पदार्थांचे सेवन करणारा बलराम उर्फ बल्लू हा चोरीच्या उद्देशाने शनिवारी रात्री घराजवळ आला असताना ही कुत्री त्याच्या अंगावर भुंकली असता त्याने त्या कुत्रीच्या गुप्तभागात सळी घुसवून तिला जखमी केले.

दुसऱ्या दिवशी कुत्रीची शोधाशोध करत असताना ती जखमी झाली असून तिच्या गुप्त भागात बलराम उर्फ बल्लू याने सळी घूसवाल्याची माहिती परिसरातील लोकांनी खराडे यांना दिली त्यांनी तत्काळ आपल्या जखमी कुत्रीला येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सांभारे यांच्याकडे उपचारासाठी नेले. याबाबत संतोष खराडे यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिल्यानंतर बलराम उर्फ बल्लू याच्यावर गुन्हा दखल करीत आरोपी बलराम ऊर्फ बल्लू यांस अटक केली. तर सदर घटनेबाबत प्राणीमित्र चेतन चव्हाण यांनी संताप व्यक्त केला असून अशा इसमास प्राण्यांचा छळ अधिनियम अन्वये कठोर करवाई करण्याची मागणी केले आहे.