Janajagruti Seva Samiti will enter the social sector
जनजागृती सेवा समिती सामाजिक क्षेत्रात उतरणार

बदलापूर : ज्या समाजाने आपणास नावारूपाला आणले त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, या उदात्त भावनेने बदलापूर येथे जनजागृती सेवा समिती (महाराष्ट्र)”या सामाजिक संस्थेची स्थापना घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर झाली. संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कला, क्रीडा, पत्रलेखन, दिवाळी अंक स्पर्धा, आरोग्य, महिला दिन, महिला सक्षमीकरण असे विविध उपक्रम राबविणे तसेच अंध व अपंग विद्यालय, अनाथ बालकाश्रम, वृद्धाशश्रम, वनवासी आश्रम अशा ठिकाणी भेटी देऊन त्यांना मदत करणे आणि समाजातील ज्येष्ठ-श्रेष्ठ प्रतिभावंत व्यक्तींच्या मौलिक मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल होणार आहे, असे विश्वसनीयरित्या प्रसिद्धी पत्रकांतून जाहीर केलं असून यात सचिव-संचिता भंडारी, उपसचिव-सौरभ टकले, खजिनदार-दत्ता कडुलकर, सहखजिनदार-श्रुती उरणकर तसेच कार्यकारिणी सदस्य एकनाथ गायकर, भावना परब,
दीपक वांयगणकर, महेश्वर तेटांबे,मीनल गावडे, ममता तावडे यांचा समावेश आहे. आत्माराम नाटेकर, बाळासाहेब सावंत, प्रदीप जोशी, गणेश हिरवे या मान्यवरांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती सेवा समितीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.