झुंजारराव मार्केट सुरु करण्यास पालिकेची परवानगी

कल्याण : झुंजारराव मार्केटमधील दुकाने उघडण्यास महापालिका प्रशासनाने सशर्त परवानगी दिली असून किरकोळ विक्री व्यवसायासाठी दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर घाऊक धान्य व्यापाऱ्यांनी

कल्याण : झुंजारराव मार्केटमधील दुकाने उघडण्यास महापालिका प्रशासनाने सशर्त परवानगी दिली असून किरकोळ विक्री व्यवसायासाठी दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर घाऊक धान्य व्यापाऱ्यांनी एपीएमसीमधूनच आपले व्यवसाय करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने काढले असून शासकीय नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास महापालिकेकडून कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेतील झुंजारराव धान्‍य मार्केटमध्ये धान्‍य खरेदीसाठी नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यामुळे नागरिकांची गर्दी टाळण्‍याच्‍या दृष्टीने १४ एप्रिलपासुन हे मार्केट धान्‍य विक्रीसाठी कृषी उपन्‍न बाजार समितीच्‍या आवारात स्‍थलांतरीत करण्‍यात आले होते.