jitendra awhad

अल्लाह(allah) यांना माहीत होते कोरोना(corona) येणार आहे,म्हणून मुंब्र्यात(mumbra) कब्रस्थान झाले असल्याचे धक्कादायक विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(jitendra awhad) यांनी केले आहे.

  ठाणे: अल्लाह(allah) यांना माहित होते कोरोना(corona) येणार आहे,म्हणून मुंब्र्यात(mumbra) कब्रस्थान झाले असल्याचे धक्कादायक विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(jitendra awhad) यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी संध्याकाळी संपन्न झाला.त्यावेळी आव्हाड यांनी अजब विधान केले.

  बहुमुस्लिम विधानसभा क्षेत्र असलेल्या कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यात वादग्रस्त विधान केले. हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत असून भविष्यात आव्हाड अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०११ मध्येच अल्लाहला माहीत होते कोरोना कधी येणार आणि त्यानंतर २०२० मध्ये कोरोना महामारी आली आणि म्हणूनच २०१९ मध्ये आपल्याला कब्रस्थान मिळाले असल्याचे आव्हाड बोलले. त्यानंतर मुंब्रा परिसरात एकच खळबळ उडाली.

  कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने वादंग माजण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मुंब्रावासियांची वर्षानुवर्षे कब्रस्थानची मागणी ही अनेक वर्षांनंतर पूर्ण झाल्याचे अपयश झाकण्यासाठी मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी अल्लाहचा सहारा घेतल्याची चर्चा सुरु झाली. २०१९ ला मुंब्रावासीयांसाठी कब्रस्थान तयार झाले आणि मिळाले. डॉ.आव्हाड यांनी केलेले विधान हे मुस्लिम जमातीला खूष करण्यासाठीचे राजकारण करण्यात आले.

  मात्र असे विधान केल्याने अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. बहुमुस्लिम क्षेत्र असल्याने मुस्लिमाना रिझवण्यासाठी अशा प्रकारची भावुक वक्तव्य डॉ. जितेंद्र आव्हाड करीत असतात.

  अनेक वर्षांपासून होती मागणी

  आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा विधानसभाचे तब्बल तीन टर्म त्यांनी याच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. मुंब्रा परिसरात कब्रस्थान हवे आहे अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांमधून होत होती. मात्र कब्रस्थान होऊ शकले नव्हते, कुठल्यानं कुठल्या अडचणी आल्या. मात्र २०१९ मध्ये मुंब्रावासियांना कब्रस्थान मिळाले. दिरंगाई आणि असफलता यामुळे डॉ आव्हाड यांनी त्यावर पांघरून घालण्यासाठी ही राजकीय खेळीचे राजकारण केल्याची चर्चा जोरदार मुंब्रा परिसरात आणि विरोधकांमध्ये रंगली आहे. सोशल मीडियावर डॉ. आव्हाड यांचे वक्तव्य व्हायरल झाले असून भविष्यात आव्हाडांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.