bharat band

शेतकरी आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबरला  भारत बंदची(bharat band) हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये अद्याप मुंबईमधील रिक्षा आणि टॅक्सी संघटना सहभागी होणार असल्याबाबत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र या भारत बंदला कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने देखील पाठींबा दिला आहे. त्यामुळे कल्याणमध्ये उद्या रिक्षा बंद ठेवून शेतकऱ्यांचे समर्थन करण्यात येणार आहे.

कल्याण : शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शेतकरी आंदोलनास(farmers agitation) जाहीर पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबरला  भारत बंदची(bharat band) हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये अद्याप मुंबईमधील रिक्षा आणि टॅक्सी संघटना सहभागी होणार असल्याबाबत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र या भारत बंदला कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने देखील पाठींबा दिला आहे. त्यामुळे कल्याणमध्ये उद्या रिक्षा बंद ठेवून शेतकऱ्यांचे समर्थन करण्यात येणार आहे.

दिल्लीच्या सीमेवर देशातील शेतकऱ्यांनी केद्रं सरकारने शेतकरी विरोधी कायदे संमत केले ते कायदे रद्द व्हावे या मागणीसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. शेतकरी विरोधी कायदे केल्याने या देशातील शेतकरी संपूर्णपणे नष्ट होऊन शेती व्यवसाय हा बड्या मक्तेदार, भांडवलदारांच्या ताब्यात जाऊन शेतकरी उद्ध्वस्त होण्याची दाट भीती आहे. या देशातला शेतकरी हा वाचला पाहिजे त्याला संरक्षण मिळाले पाहिजे म्हणून कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ शेतकरी आंदोलन व भारत बंदला जाहीर पाठिंबा देत आहे. मात्र मुंबईतल्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी अद्याप भारत बंदमध्ये सहभागी होण्याबाबत भाष्य केलेले नाही. तसेच पाठिंबाही जाहीर केलेेला नाही.

८ डिसेंबर रोजी सर्व कोकण विभागातील रिक्षा टॅक्सी संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते, यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना अवगत करुन रिक्षा टॅक्सी बंद ठेऊन भारत बंद व शेतकरी आदोलंनास पाठिबां द्यावा असे आवाहन कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी केले आहे.