कंटेनमेंट झोनमधील नागरिक इतर भागात गेल्‍यास क्‍वारंटाईन कक्षात रवानगी

कल्याण : आयरे गावातील काही व्‍यक्ती १९ एप्रिल रोजीसोनारपाडा, कल्‍याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व या भागात आल्‍याची माहिती महापालिका प्रशासनाला प्राप्‍त झाली होती. आयरे

 कल्याण :  आयरे गावातील काही व्‍यक्ती १९ एप्रिल रोजी सोनारपाडा, कल्‍याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व या भागात आल्‍याची माहिती महापालिका प्रशासनाला प्राप्‍त झाली होती. आयरे गाव हा भाग कोरोना कंटेंनमेंट झोनमध्‍ये येत असल्‍याने याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करुन सदर व्‍यक्तींना वसंत व्‍हॅली येथील क्‍वारंटाईन कक्षात दाखल केले असून, पुढील १४ दिवस त्‍यांना त्‍याच ठिकाणी रहावे लागणार आहे. यापुढेही कोरोना कंटेनमेंट झोनमधील व्‍यक्ती/नागरिक इतर भागात गेल्‍याचे आढळून आल्‍यास त्‍यांनादेखील महापालिकेच्‍या क्‍वारंटाईन कक्षात दाखल करणेबाबत व पुढील १४  दिवस त्‍यांना तेथेच ठेवण्याबाबत आदेश पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले असून सदर आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्‍याचा सुचना दिलेल्‍या आहेत.