कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये आढळले ४७ रुग्ण

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ४७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ४७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १२७६ झाली

 कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ४७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ४७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या  १२७६ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला असून ५९५  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ६४६ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील २०, कल्याण पश्चिमेतील ६, डोंबिवली पूर्वेतील ९, डोंबिवली पश्चिमेतील ७ तर टिटवाळा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये  २० पुरुष, २२ महिला आणि ५ मुलं आहेत.

आजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील चक्कीनाका, पिसवली, जाईबाई विद्या मंदिराजवळ, लोकग्राम, नांदीवली, कर्पेवाडी, हाजी मलंग रोड, पुना लिंक रोड, शिवाजी कॉलनी रोड, आनंदवाडी, कल्याण पश्चिमेतील रोहिदास वाडा, खडकपाडा सर्कल, बेतूरकर पाडा, दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ टिळक चौक, शिवाजी चौक परिसर, रौनक सिटी फेज २, डोंबिवली पूर्वेतील अयोध्या नगरी, नवीन आयरे रोड,  आजदे गाव, गोग्रासवाडी, आयरे रोड,  डोंबिवली पश्चिमेतील दिन दयाल क्रॉस रोड, एम.पी. रोड, गरीबाचा वाडा, कुंभारखान पाडा,  महात्मा फुले रोड,  सुभाष रोड, टिटवाळा येथील सांगोडा रोड मांडा, गणेश विद्यालयाजवळ मांडा, माता मंदिर रोड आदी परिसरातील आहेत.