सात वर्षांनतर कल्याणच्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी वॉन्टेड गुंड गुड्डूला ठोकल्या बेड्या, दोन साथीदारांनाही अटक

कल्याणच्या(kalyan) महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये माजीद अली उर्फ गुड्डू मन्सूर अली शेख(Guddu Mansur Ali Sheikh) याच्यावर चार ते पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद असून २०१४ पासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

    कल्याण : सात वर्षांपासून(Most Wanted Criminal Arrested After 7 Years) पोलिसांना गुंगारा देऊन आपले अस्तित्व लपवीत अनेक दखलपात्र गुन्ह्यांत पोलिसंना ठेंगा दाखवीत फरार असलेल्या गुंडाला क्राईम ब्रांच युनिट ३(Crime Branch Unit-3) ने मोठ्या शिताफीने अटक करून महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या(Mahatma Phule Police Station) ताब्यात दिले आहे. कल्याणच्या(kalyan) महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये माजीद अली उर्फ गुड्डू मन्सूर अली शेख(Guddu Mansur Ali Sheikh) याच्यावर चार ते पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद असून २०१४ पासून पोलीस त्याचा शोध घेत होते. नेवाळी प्रकरणामध्ये हील लाइन पोलिसांना पाहिजे असणारा प्रमुख आरोपी म्हणून तो हवा होता.

    गुड्डू सात वर्षांपासून सतत जागा बदलत असल्याने पोलिसांना चकवा देण्यात सरस ठरत होता. गुड्डू हा नामचिन गुंड असून न्यायालयाने जाहीरनामा काढून लखनऊ येथील १ करोड ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करून लिलावाचे आदेश देऊनही तो पोलिसांना शरण जात नव्हता. माजीद अली उर्फ गुड्डू हा पूर्वी कामराजनगर घाटकोपर पूर्व येथे वास्तव्यास होता. क्राइम ब्रँच ३चे युनिट कल्याण समांतर तपास करीत असतानाच पोलिसांनी आपल्या गुप्त बातमीदारांकडून त्याचा मोबाईल नंबर व तांत्रिक तपास करून नवी मुंबईतील कामोठे येथे राहात असल्याची पक्की खबर भेटल्यानंतर सापळा रचत आज त्याला मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली.गुड्डू याच्यासोबत दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. यातील एका आरोपीला तीन तर दुसर्‍या आरोपीला पाच वर्ष कैद अशी शिक्षा न्यायालयाने दिली आहे.

    गुड्डूवर यूपीमधील खोडारे पोलीस स्टेशनमध्ये देखील गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.क्राइम ब्रँच युनिट ३चे कल्याण विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, विलास मालशेटे, दत्‍ताराम भोसले, सचिन साळवी ,राजेंद्र खिल्लारे ,मंगेश शिर्के,केशव निकुळे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगारा, अजित सिंग राजपूत ,सचिन वानखेडे,मिथुन राठोड, गुरुनाथ जरग,गोरक्ष शेकडे, राहुल ईशी आधी पोलिसांनी कारवाईचा सापळा रचून विविध गुन्ह्यात फरार व हवा असणाऱ्या गुंडाला कामोठे येथून ताब्यात घेत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.