कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक – २४३ नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवलीतीची पुन्हा लॉकडाऊनकडे वाटचाल सुरु असून आज कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी द्विशतक पार केले आहे. गेल्या २४ तासांत तब्बल

 कल्याण : कल्याण डोंबिवलीतीची पुन्हा लॉकडाऊनकडे वाटचाल सुरु असून आज कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी द्विशतक पार केले आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २४३  नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. आजच्या या २४३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३२५७ झाली आहे.

रोज मोठ्या संख्येने वाढणाऱ्या या कोरोना रुग्णांच्या संख्येने कल्याण डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची मागणी आता जोरधरू लागली आहे. तर भिवंडीला ज्याप्रमाणे १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीत देखील लॉकडाऊन लागू करा अशी मागणी नागरिक करत आहेत. आज झालेल्या दोन मृत्युंमध्ये कल्याण पश्चिमेतील ६९ वर्षीय पुरुष आणि टिटवाळा येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण ३२५७ रुग्णांपैकी १८४८ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १३३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.