कल्याण डोंबिवलीत २३६ नवे कोरोना रुग्ण; एकाचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांच्या संख्येने ३ हजारांचा आकडा गाठला असून आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी द्विशतक पार केले आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २३६ नव्या कोरोना

 कल्याण : कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांच्या संख्येने ३ हजारांचा आकडा गाठला असून आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी द्विशतक पार केले आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २३६  नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजच्या या २३६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील एकूण कोरोना ३०१५ झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी रुग्णांची नोंद होणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही ठाणे जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे.

आज झालेल्या एका मृत्युंमध्ये टिटवाळा येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण ३०१५ रुग्णांपैकी १६४८ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १२९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
कल्याण डोंबिवलीतील रोज वाढणारी कोरोना रुग्णांच्या संख्येने पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून हि परिस्थिती हाताळण्यात पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पालिका आयुक्तांसोबतच या रुग्णसंख्या वाढीला सत्ताधारी शिवसेनादेखील तेवढीच जवाबदार आहे. शहरात रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशी आरोग्य व्यवस्था नसल्याने उपचाराअभावी रुग्णांचे मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. गेली कित्येक वर्षे शिवसेनेची सत्ता महानगरपालिकेवर आहे. मात्र एवढ्या वर्षात येथील नागरिकांसाठी अत्याधुनिक रुग्णालय देखील उभारू न शकल्याने आज ही परिस्थिती ओढावली आहे.