कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६ हजारांचा टप्पा

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने ६ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज एकाच दिवशी तब्बल ४३५ रुग्ण आणि ६ जणांचा मृत्यू झाल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे. आजच्या या

 कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने ६ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज एकाच दिवशी तब्बल ४३५ रुग्ण आणि ६ जणांचा मृत्यू झाल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे. आजच्या या ४३५ रुग्णांमुळे कोरोना रुग्णांची संख्या  ६११३ झाली आहे. या ६११३ रुग्णांमध्ये ३७०६  रूग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून एकूण २२९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ११३ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.