कल्याण डोंबिवलीमध्ये ३२३ नवे कोरोना रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू – कोरोना रुग्णांची संख्या ४५१५

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोनाने हाहाकार माजवला असून आज एकाच दिवशी तब्बल ३२३ रुग्ण आणि ६ जणांचा मृत्यू झाल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे. आजच्या या ३२३ रुग्णांमुळे कोरोना

 कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोनाने हाहाकार माजवला असून आज एकाच दिवशी तब्बल ३२३ रुग्ण आणि ६ जणांचा मृत्यू झाल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे. आजच्या या ३२३ रुग्णांमुळे कोरोना रुग्णांची संख्या ४५१५  झाली आहे. या ४५१५ रुग्णांमध्ये २३६५ रूग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून एकूण २०५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ९१ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.

दरम्यान गेले काही दिवस कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दररोज द्विशतक गाठत होती. आज मात्र या रुग्ण संख्येने तृतीय शतकदेखील ओलांडले आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून दुसरीकडे पालिकेची आरोग्य व्यवस्था या रुग्णांना उपचार देण्यात कमी पडत आहे. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे आपल्या प्राणांना मुकावे लागत आहे. शासकीय मोफत उपचार मिळणाऱ्या ठिकाणी सोयी सुविधांची उपलब्धता कमी असून खाजगी दवाखाने कोरोना रुग्णांना आपल्या उत्पन्नाचे साधन समजून लाखोंचे लुटमार करत आहे. त्यामुळे जगावे की मरावे हा प्रश्न सामान्य नागरिकांपुढे उभा राहिला आहे.