कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरुच – एकाच दिवशी आढळले तब्बल ३५८ रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच असून आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येने त्रिशतक पार केले असून आज एकाच दिवशी तब्बल ३५८ रुग्ण आणि ५ जणांचा मृत्यू झाल्याने कल्याण

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच असून आज पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येने त्रिशतक पार केले असून आज एकाच दिवशी तब्बल ३५८ रुग्ण आणि ५ जणांचा मृत्यू झाल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे. आजच्या या ३५८ रुग्णांमुळे कोरोना रुग्णांची संख्या ४८७३ झाली आहे. या ४८७३  रुग्णांमध्ये २६७८ रूग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून एकूण २०९९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ९६ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर आळा बसावा यासाठी पालिकेकडून संपूर्ण पालिका क्षेत्रात लॉकडाऊन न करता, ११७  कटेंन्मेंट झोन पैकी ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या जास्त वाढत आहे अशा १६ कटेंन्मेंट झोन मध्ये लॉकडाऊन लागू करून हे परिसर सील करण्यात येणार आहे. याठिकाणी लॉकडाऊनची कडक अमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी एस.आर.पी.एफ दलाची देखील मदत घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 महापालिका क्षेञातील रूग्‍णाची वाढती संख्‍या लक्षात घेता त्‍यांना अधिक चांगल्‍या उपचार देण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातुन महानगरपालिका वै. ह.भ.प. सावळाराम क्रिडा संकुल डोंबिवली येथील कै. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात ३० बेडचे आयसीयु सुविधा व १७० बेडची ऑक्सीजनची सुविधा असलेले डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर निर्माण करत असून ते १ जुलै पासुन कार्यान्वित होणार आहे. त्याचप्रमाणे लाल चौकी, कल्याण (प) येथे बीओटी तत्वावरील इमारतीत १२० बेडचे आयसीयू आणि २५० बेडची ऑक्सीजन सुविधा असलेले डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डोंबिवली येथील जिमखाना परिसरात १५० बेडचे आयसीयू आणि ३०० बेडचे ऑक्सीजन सुविधा असलेले डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर निर्माण करण्याच्या कामास प्रारंभ होत असून १५ जूलै पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे गंभीर आजारी असलेल्या बाधित/संशयीत रुग्णांसाठी महापालिकेची सुविधा उपलब्ध होणार आहे.